टोकियो : भारताची बॅडमिंटनस्टार पी.व्ही सिंधू आज जपान ओपन स्पर्धेत पुन्हा नोझोमी ओकुहाराशी भिडणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार दिवसांत या दोघीही दुसऱ्यांदा आमनेसामने येतायत. कोरिया ओपन सुपर सीरिजच्या अंतिम फेरीत दोघी समोरासमोर आल्या होत्या. त्याआधी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दोघी आमनेसामने आल्या होत्या.


वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये नोझोमीने सिंधूला हरवले होते. त्यानंतर कोरिया ओपनच्या अंतिम सामन्यात सिंधूने या पराभवाचा बदला घेत जेतेपद उंचावले. आज या पुन्हा दोघी एकमेकांशी भिडणार आहेत.